मी करते आहे तसे शास्त्रीय माहिती प्रकारचे लेखन लेखमालेच्या स्वरूपात इतरही करतात, मात्र पहिल्या पहिल्या लेखानंतर प्रतिसादांची संख्या मंदावत जाते. ह्यामुळे अशा प्रकारे लेखमाला लिहिणार्‍यांना हे कळत नाही की लोकं आपण लिहिलेलं वाचताहेत की नाही. त्यामानाने सहित्य व सामाजिकवाद यावर आधारित लेखमालांना जास्त काळ प्रतिसाद मिळतात.

त्यामुळे माझी अशी विनन्ती आहे की जर कुणी लेखमालेतील नवीन भाग प्रकाशीत झाल्यावर वाचत असेल तर कृपया 'मी वाचतो/वाचते/वाचले आहे' अशा प्रकारचा प्रतिसाद लिहा. प्रत्येकाने अभिनन्दन/कौतुक करणारा प्रशंसात्मक प्रतिसाद लिहावा अशी अपेक्षा नाही. परंतु लिहिलेले भाग कुणी वाचते आहे की नाही हे प्रतिसादांशिवाय कसे लक्षात येणार? आणि लिहिण्याचा उत्साह कायम तरी कसा रहाणार?

मागे मंदारने सोन्यावर सुरू केलेली लेखमाला माहितीपूर्ण आणि चांगली असूनही प्रतिसादांच्या अभावामुळे खट्टू होऊन बंद केली. मला प्रभाकर पेठकरांनी दुसरा व तिसरा भाग वाचून प्रतिसाद लिहिला त्यामुळे निदान ते ही लेखमाला वाचत आहेत हे कळले. मात्र बाकिचे वाचतात का, बाकिच्यांना वाचायला आवडत आहे का, हे कळले तर लेखमाला पुढे सुरू ठेवता येईल.