काही मुद्दे सोडले तर रोचक माहीती.
ऍनिमल प्लॅनेट, नॅशनल गिओग्राफीक, डिस्कव्हरी या वाहीन्यांवर असेच अजुन काही शिकलो आहे.
आपल्या सर्वांना सिंह हा जंगलचा राजा व नंतर ऐदी (फ़क्त खाणे व प्रजा वाढवणे) असे माहीत आहे पण सिंहाचे (नर) आयुष्य पाहीले तर कीती खडतर आहे ते कळेल. जरा मोठा होतो वयाने तर कळपातून हकालपट्टी, बरोबर आहे. पण जर का तो एकच नर सिंह कळपात असेल व त्याला बाहेर काढले तर ९९.९९% काही दिवसातच त्याचा भूकबळी किंवा दुसऱ्या ताकदवर प्राण्याकडून खून. जर जगला तर रोज युद्धाचा प्रसंग कारण दुसरा सिंह आपल्या हद्दीत का आला म्हणून मारणार. ह्या सगळ्यातून असेच समवयस्क कळपातून हाकलेले साथीदार निवडून स्वतःची टोळी बनवणे व त्या टोळीत स्वतःचे प्रमुखपद ताकदीवर मिळवणे. हे तरूण सिंह स्वतः शिकार करतात, चोरी करणे, कुठे राहीलेले, टाकून दिलेले मांस खाणे. एकदा का चांगली शारीरीक वाढ झाली. मग सिंहीणी असलेल्या कळपावर तेथील प्रमुख नराला पराभूत करून सत्ता प्रस्थापीत करणे. मग कूठे त्या बिचाऱ्याचा ऐदी (फ़क्त खाणे व प्रजा वाढवणे) पणा सुरू होतो. कळपप्रमुख म्हणून सरासरी २ ते ४ वर्षाचा हा काल असतो म्हणे. शिवाय ह्या कालावधीत बाहेरील नर सिंहाच्या आव्हानाला तोंड देणे असतेच. मुख्य म्हणजे पराभूत सिंह हा तिथल्या तिथे युद्धात मेला नाही तरी जखमी किंवा वार्धक्याने हलाखीचे मरण असते. तसेच हे नवे नवे प्रमुख झालेले सिंह सुरवातीला मदत करतात शिकार करायला म्हणजे ते शिकार होत आहे त्या भागात असतील तर. नंतर त्यांना हळूहळू कळते की ह्या बायका हे नेहमीच काम करतातच व आपल्या पंज्यापुढे कोणी आवाज करू शकत नाही म्हणून मग तशी सवय होते.
त्यामानाने सिंहीणी एकमेकांना साथ देत, नराच्या मानाने बरेच सुखी आयुष्य जगतात.
अजुन एक वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा बाहेरील सिंह कळपकाबीज करतो, लगेचच त्या कळपातील सर्व पिल्लांना मारून टाकतो. ते दृश्य काही बघवत नाही.