खरे तर कोणे एके काळी कोण्या एका खवय्या माणसाच्या सुपिक डोक्यात आलेली कल्पना म्हणजे उपवास! ऱोज ऱोज तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्या त्या चतुर माणसाने त्याच्या आवडिच्या पदार्थांची हजेरी त्याच्या पानात नियमीत होण्यासाठी केलेली युक्ती त्याच्या सारख्या खवय्या लोकांच्या पचनी न पडेल तर नवल! असो!

आता कुठले पदार्थ काय काय जिन्नस घालुन करणे बाबत बोलायचे झाले तर साधे उत्तर आहे, पुर्वी जेव्हा दळण-वळण नव्हते तेव्हा उदा. कोकणात साबुदणा, जिरे मिळत नसेल तर तेव्हा खिचडी माहीत नसेल, बरोबर? म्हणजेच आज जर कोकणातल्या माणसाने उपवासाच्या म्हणजेच रुढार्थाने साबुदाण्याच्या खिचडीची पाक-कृती अमुक अमुक जिन्नस घालुनच करावी असे सांगितले तर ते फारसे गांभिर्याने घेउ नये! या आणि अश्या अनेक पदार्थांची उगमस्थाने शोधुन काढल्यास आपल्याला कळेल की आज आपण समजतो ते सारे उपवासाचे पदार्थ म्हणजेच जिभेचे चोचले असुन दुसरे काहिही नाही!

तुर्तास इतके पुरे! सुज्ञपणाने विचार करा आणि आपणास जे रुचेल, पचेल ते खा! उपवास वगैरे सब झूठ आहे.