आपण ज्या शंका/प्रश्न/माहिती विचारली त्याची उत्तरे आज-उद्या चितमपल्ली काकांकडे ( तशी माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नाही)जाऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. सध्या ते नागपुरात आहेत. त्यांचे वास्तव्य भंडारा जि. धाबे-पवनी इथे असते. सध्या ते मस्त्यकोषावर काम करत आहे. आर्थिक अडचणीमुळे काम जरा रेंगाळलं आहे. ह्या कार्यक्रमात वनराईचे मा̱. गिरीश गांधींनी खेद व्यक्त केला व काल ७५००० रु. धनादेश दिला. स्थानिक लोकांनी दखल घेतली हेही नसे थोडके.