सुदैवाने मला माझ्या दोन्हीकडील आजी-आजोबांचा भरपूर सहवास लाभला. मी शिक्षणाच्या निमित्ताने काही वर्षे आळीपाळीने त्यांच्या घरी राहिले होते. तसेच माझ्या मुलाच्या सुदैवाने त्यानेही पणजोबा आणि पणजीकडून खूप लाड करून घेतले. आता माझी एक आजी ८५ वर्षाची आहे. बाकिच्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत.