गेल्या काही वर्षात पुण्यातल्या बसप्रवासात आलेल्या अनुभवांवरुन अनुष्का यांच्या मताला पुष्टी देतो.
१.मागील महिन्यात सुट्टे पैसे मागितले म्हणून कंडक्टरला एका प्रवाशाने मुस्काटीत मारले. "फक्त महिलांसाठी" लिहिलेल्या जागेवरून एका पुरूष प्रवाश्यास उठण्यास सांगितले तर कंडक्टरला चपलेने मारले अशा बातम्या वाचल्या आहेत. त्यामुळे एक दिवस "नियमानुसार काम" असे आंदोलन पीएमटी कंडक्टरांनी केले होते.
२. बसमध्ये अगदी उभे राहायलाही जागा नसल्यामुळे बसस्टॉपवर (कोणी उतरणारे नसल्याने) बस थांबवली नाही म्हणून थेरगाव येथे ड्रायव्हरला खाली ओढून मारहाण केल्याचा प्रसंग माझ्यासमोरच घडला आहे.
३.पिंपरी चौक ते डीवायपाटील वैद्यकीय महाविद्यालय या प्रवासात कंडक्टरने नियमानुसार तिकिट काढले नाही म्हणून एकाला खाली उतरवले तर "वो तो अच्छा था इसलिये उसने आपको पिटा नही" वगैरे धमकी देणारे 'विद्यार्थी' नेहमी बघायला मिळतात.
४. पुढून चढू नका असे घसा ताणून ओरडून सांगितले तरी प्रत्येकाला रिकामा दरवाजा बघून पुढूनच चढावेसे वाटते. मग गच्च भरलेल्या गाडीत तिकीट काढण्यासाठी पुढून मागे व मागून पुढे असे कंडक्टरला फिरावे लागते.
कंडक्टर सर्वगुणसंपन्न नसतात. पण किमान माणुसकीने व आपली अक्कल वापरुन त्यांच्याशी वागावे हीच अपेक्षा.