शशांकशेठ एकदम आमच्या आवडीचा विषय काढलाय.. .. पोटार्थ भारतातील काही राज्यात वास्तव्य करायचा योग आला. त्या त्या प्रांतातले मला आवडलेल्या सकाळच्या नाश्त्याला खायच्या जोड्या इथे देतो..
मध्यप्रदेश. पोहे आणि जिलबी
गुजरात.. फाफडा आणि जिलबी 
पंजाब / दिल्ली.. आलूपराठा( भरपूर घी लावलेला) आणि दही ( सोबत आंब्याच्या / मिरचीच्या लोणच्याची फोड)
तामिलनाडू.. पोंगल आणि चटणी,
कर्नाटक.. खालीदोसे आणि नारळाची चटणी, बेण्णे ( लोणी)दोसे आणि चटणी
केरळा.. आपम आणि पुट्ट ( अंडे) करी
(ऑम्लेट ब्रेडबटर टोस्ट,शेव-उप्पिट, मिसळ-पाव, खिचडी- खमंग काकडी, फोडणीची पोळि/भाकरी - दही/ताक, हे गृहित धरलं)

किती लिहावे तितके थोडे आहे
केशवसुमार
अवांतर: हे सगळं इथे लिहिले आणि लक्षात आलं राणीच्या देशात जिथे राहतो आहे तिथे हे काही ही मिळत नाही.. लवकर भारताला भेट दिली पाहिजे..