खरे तर कोणे एके काळी कोण्या एका खवय्या माणसाच्या सुपिक डोक्यात आलेली कल्पना म्हणजे उपवास!
अगदी! एकादशी आणि दुप्पट खाशी हेच सहसा उपवासाचे स्वरुप असते.
कोकणात साबुदणा, जिरे मिळत नसेल तर तेव्हा खिचडी माहीत नसेल, बरोबर?
अगदी असेच नाही. साबुदाणा, बटाटा, मिरची, चहा हे सर्व पदार्थ मूळचे भारतीय नाहीत. "हे खाऊ नये" च्या यादीत ते येतच नाहीत म्हणजेच ते खाण्याच्या यादीत चालून जातात. दुसऱ्या शब्दांत, पिझ्झा, पास्ता, न्यूडल्स हे ही उपवासासाठी चालण्यास हरकत नाही.
सुज्ञपणाने विचार करा आणि आपणास जे रुचेल, पचेल ते खा!
बरोब्बर बोललात! उदा. साबुदाणा पचण्यास जड असतो आणि तोच उपवासाला खाल्ला जातो.