न्यायालये,पारपत्र खाते,वाहन चालक परवाना मिळण्यासाठीचे खाते, अशा काही गोष्टी जर २४ तास चालू असल्या तर?
उपरोल्लेखित सेवा या तातडीच्या अत्यावश्यक सेवा आहेत काय? यातच तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर आहे. वैद्यकसेवा, नागरी सुव्यवस्था, पोलिसी यंत्रणा, दूरध्वनी खाते आणि अशी इतर खाती अत्यावश्यक तातडीच्या सेवा पुरवतात. राज्यसेवेतील वाहतूकही रात्री बंद ठेवली जाते कारण तुटपुंज्या प्रवाशांसाठी इंधन किंवा वीज खर्च करणे सरकारला नुकसानदायी ठरते.
न्यायालये,पारपत्र खाते,वाहन चालक परवाना मिळण्यासाठीचे खातेसारख्या सेवा २४ तास ठेवल्या तर कर्मचाऱ्यांचे पगार, कार्यालयीन खर्च यासाठी नागरिकांवर कर्जाचा जो अतिरिक्त बोजा पडेल तो भरण्यास आपण तयार आहात काय?