श्री. शुभानन गांगल ह्यांनी अतिशय मेहनतीने आणि निगुतीने वरील सॉफ़्टवेअर तयार केले आहे असे कळते. त्यांचे अभिनंदन!
संगणकातील विंडोजमधल्या वर्डस्, एक्सेल, पेजमेकर, कोरलड्रॉ, फोटोशॉप, या सर्व रचनांत हा फॉण्ट कुठेही विरूप न होता कार्यरत होतो. १)ईमेल मधून फॉण्ट पाठवता यावा, २)केवळ कॅपीटल आणि स्मॉल की-वरच तो बसावा, ३)वेबवरून मराठी अभिप्राय लिहीता यावा, ४)विंडोजमधल्या रचनांचा अधिकांश वापर करता यावा, ५) तो व्हायरस पासून मुक्त रहावा, ६) तो मोफत उपलब्ध व्हावा, यांना प्राधान्य देत तो बनविला आहे.
वरीलपैकी बऱ्याच गोष्टी युनिकोड फाँट वापरून सहज शक्य होतात. केवळ कोरलड्रॉ, फोटोशॉप, पेजमेकर मध्ये देवनागरी युनिकोड फाँट सध्या नीट किंवा बिलकुलच वापरता येत नाहीत.
युनिकोडचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढते आहे. अशा परिस्थितीत ह्या फ़ाँटची उपयुक्तता कितपत आहे ह्याबाबत मी साशंक आहे. हा फाँट मी निरखून बघितला आहे. फ़ाँट विशेष देखणा नाही. त्याबद्दल काहीतरी करायला हवे. गांगलांनी युनिकोडकडे वळायला हवे.
बाकी विरंगुळा म्हणून अशाप्रकारचे कुठलेही सॉफ्टवेअर चांगले.