देवनागरी लिपीतून मराठी भाषेत लिहिण्यासाठी यापूर्वी अनेक प्रोग्रॅम निघालेले आहेत. ते वापरून लिहिलेला मजकूर स्वतः वाचण्यासाठी किंवा कागदावर प्रत छापण्यासाठी ते उपयुक्त आहेत. पण हे लिखाण दुसऱ्या कोणी वाचायचे असल्यास त्याचेकडे तेच सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. युनिकोड वापरल्यास तसली गरज नाही. त्यामुळे अधिकाधिक लोक ते वाचू शकतात. गांगल यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ही सोय आहे की नाही हे मला माहीत नाही. पण जर ती नसेल तर ते सॉफ्टवेअर वापरून बनवलेली वर्ड, एक्सेल वगैरे कोणतीही फाईल दुसऱ्याच्या उपयोगाला येणार नाही.