कंडक्टरचे काम सहनशक्ती बघणारे असते. त्यांचे काम दिवसातील बराचसा वेळ उभे राहूनच करावे लागते, तेही मरणाच्या गर्दीत, परत पैशाचा हिशोब ठेवावा लागतो.  
मागे एकदा मी शरद उपाध्येंच्या एका मुलाखतीत वाचल्याचे आठवते की त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते काही जागा डॉक्टर, कंडक्टर, पोलीस यांच्यासाठी राखून ठेवतात. गणपतीच्या मिरवणुकीत पोलीसांना २-३ दिवस सलग काम करावे लागते, जेवायची पण सुट्टी मिळत नाही आणि आपण सामान्य लोक यांच्याकडे लक्षही देत नाही तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्याची गोष्ट खूपच लांबची!