कोणी खाल्ला नाहीये का?
ताकाची पिवळीधमक कढी आणि त्यात डुंबणारा बटाटवडा. वडा थंड/शिळा असावा मग अधिक चांगला लागतो. कढी मात्र गरम गरम. जीभ भाजली पाहिजे. नंतर गल्ल्यावर मिळणारा १ रुपयाचा गोल पेढा खावा.
खेड-मंचर-जुन्नर-नारायणगाव-आळेफाटा परिसरात कोणत्याही हॉटेलात चांगलाच मिळेल.
अप्रतिम कढीवडा मिळण्याचे ठिकाण: हॉटेल मयूर, मंचर ग्रामपंचायतीच्या समोर.
अजून एक आवडती जोडी: फोडणीचा परतलेला शिळा भात व सायीचे दूध.
बाकी वरच्यांशी सहमत.
ज्वारीची भाकरी आणि कारळ्याची चटणी/लसणीची चटणी/ठेचा वर कच्चे तेल
यात भाजलेला पापड चुरून घालावा. पोटात नंतर दोन तास गोविंद गोविंद भजन होते. (क्षमा जीए!)
शंका: वरणफळे आणि घाटले हे काय प्रकार आहेत?