अत्यंत मौलिक, उपयुक्त अशी माहिती आणि वादातीत संदर्भ. आभार.

आजच्या, नामदेव ढसाळ, भुजंग मेश्राम, यांच्यासारख्या आणि इतरही अनेक `विद्रोही' कवींना यात कुठे बसवावे, हा प्रश्न मनात राहिलाच. छंद, जाति आणि वृत्त यांच्याशी यांच्या कवितांचे आणि `नवकविते'चे नाते दिसते का? ते कोणते? त्यांना कवी म्हणून मान्यता मिळालेली आपण पाह्तोच आहोत. समाजानं, साहित्यातल्या कवितेच्या प्रांतानं त्यांना कवी म्हणून स्वीकारलंय. का?