(माझ्या माहितीप्रमाणे थोडी भर घालत आहे. काही चुकले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावे.)

काही टीपा:

१. ओळीच्या शेवटचे अक्षर नेहमी गुरू असावे. क्वचित ते लघू असले तरी ते गुरू धरले जाते. कारण त्याचा उच्चार दीर्घच होतो.

२. जोडाक्षराच्या आधीचे अक्षर लघू असले तरी ते गुरू होते.
उदा. :   प्र̮य̱त्नें̱ वा̱ळू̱चे̱ क̮ण̮ र̮ग̮डि̮ता̱ ते̱ल̮ही̱ ग̮ळे̱

याठिकाणी य हा लघू असूनही गुरू झाला आहे. 

याला अपवादही आहेत. जोडाक्षरामुळे आधीचा अक्षरावर जर वजन पडत नसेल तर ते लघू अक्षर लघूच रहाते.
उदा. :  क̮रूं̱ ये̱ स̮मा̱धा̱न̮ जो̱ मू̱र्ख̮ त्या̱चें̱
        
याठिकाणी ’त्या’ हे जोडाक्षर आले असले तरी 'र्ख'  लघूच रहातो.

-------------------------------------------------------------