या संदर्भाचा उपयोग करून आणखी लेखांक द्यावेत. विविध (वापरातील व जुनी ) वृत्ते, त्यांच्या अक्षरमात्रागणादि तांत्रिक बाबी यांचा उहापोह व्हावा.
लेख माहितीप्रद आहे. माधव ज्युलियनांच्या या कार्याचे ऋण मान्य केलेच पाहिजे.
आज छंदोबद्ध काव्यरचना नुसतीच मागे पडत नसून ते खरे काव्य नव्हेच अशी मल्लीनाथी केली जात आहे.
त्यामुळे भारतीय संस्कृतीत शतकानुशतके खोलवर रुजलेला पद्यकाव्याचा वटवृक्ष कोलमडून पडतो की काय अशी भीती निर्माण होत आहे.
हे दुर्मिळ पुस्तक पुन्हा प्रकाशात आणल्याबद्दल प्रस्तुत लेखकाचे आभार.