साबुदाणा केरळ मध्ये सुद्धा होतो! साबुदाणा परदेशी कसा काय? तसेच मिरची सुद्धा जगभर सर्वत्र मिळुन ८००० हुन जास्त जाती आणि प्रजाती आहेत. आता बरेच पदार्थ आणि वनस्पति वगैरे जगात खुप ठिकणि (सर्वत्र नव्हे) उपलब्ध असतात. त्याचा उपयोग कश्यासाठी आणि कसा करायचा ते आपण कुणाकडुनही शिकु शकतो त्याने तो पदार्थ अथवा जिन्नस परदेशी होत नाही!

आता साबुदाणा पचायला जड कि हलका, तर साबुदाणा पचायला हलका आहे, पण तो खिचडी या स्वरुपात जड! कारण त्यात भरमसाठ तेल, शेंगदाण्याचे कुट वगैर जिन्नस घातल्याने तो पदार्थ पचायला जड होणे स्वाभाविक आहे. अश्या बर्याच जिन्नसांबद्दल बरेच काही विचार करण्या सारखे आहे.

अजुन एक गम्मत: वनस्पतिजन्य तुप म्हणजेच हायद्रोजनटेड वनस्पतिजन्य तेल. आता प्राणीजन्य तुप - जे दुध देतात ते प्राणी शाकाहारीच असतात ना? मग त्या दुधा पासुन केलेले तुप आणि वनस्पती तुप यात फरक तो काय? (अर्थात हे सर्व बोलण्यापुरते आहे. शेवटी आपण आपली आवड, प्रकृती, वगैरे गोष्टी लक्षात घेउन कारभार करावा हे उत्तम!)