वरदाताई,

आपली लेखमाला अतिशय माहितीपूर्ण आणि चांगली लिहिली आहे.  ती बंद मुळीच करू नका.

मृदुलाताईंनी सांगितलेली खुबी चांगली आहे. [किती अवलोकने झाली ते बघण्याची].  त्यामुळे लोक वाचतात हे पटेल.  मनोगताचे १४०० वर सभासद आहेत.  प्रत्यक्ष लिहिणारे आणि प्रतिसाद देणारे त्यामानाने खूप कमी आहेत.  (एका दृष्टीने ते योग्यच आहे.  नाहीतर भाराभर निरर्थक लिखाण वाचावे लागेल)

आपल्या सारख्या माहितीगार आणि शैलीने लिहिणार्‍या लेखांना नेहमीच मागणी आहे.

तसेच आपल्याला असेहि आढळून येईल कि बरेच सभासद येण्याची नोंद न करता "पाहुणे" म्हणून येऊन वाचून परत जातात.  फक्त लिहिण्यासाठी वा प्रतिसाद देण्यासाठी त्यांना येण्याची नोंद करणे आवश्यक आहे.

(इथे पडीक)
सुभाष