१. सोलकढी - ज़रासा फळफळीत भात - तळलेली कोलंबी किंवा तळलेला सुरमई/पापलेट/हलव्याचा तुकडा आणि यांपैकी काहीच तळायला न ज़मल्यास बटाट्याचे/केळीचे/सुरणाचे काप किंवा वांग्याची/कांद्याची भजी
२. डाळतांदळाची खिचडी-गोडी आमटी/ताकाची कढी-उडदाचे/लसणीचे भाज़लेले पापड-आंब्याचे तिखट लोणचे
३. गोडाचा शिरा/सांज़ोऱ्या - आंब्याचे आंबटतिखट लोणचे
४. वऱ्याचे तांदूळ-दाण्याची आमटी-उपवासाची बटाटा भाजी
५. पोहे/उपमा-त्यावर भुरभुरलेली शेव/फरसाण
६. वडा-पाव(वडापावचा पाव!!!/पावभाजीचा पाव!!!) - कटिंग चहा (टपरीवरचा असल्यास उत्तम!)
७. ज़रासा फळफळीत भात - ताकाची कढी/फोडणीचे दही - सांडगे मिरची - आंब्याचे/मिरचीचे लोणचे
८. गुरगुट्या भात (मऊ भात) - मेतकूट - तूप/दही
९. चिकन/मटन (ही नसली तर 'व्हेज'!) बिर्याणी - बुंदी रायते/साधे रायते
१०. भेळ - मसाला दूध (कोजागिरी स्पेशल!)
११. साधा भात - तोय/डाळमेथी/मुगागाठी - भाज़लेला उडदाचा/बटाट्याचा/लसणीचा पापड
१२. भात - आमरस
१३. आईस्क्रीम - फ़्रूट सॅलड

तूर्तास इतक्याच...बाकी भर आठवेल तशी ...