वरणफळे आणि घाटले हे काय प्रकार आहेत?
आजानुकर्णा,
वरणफळे - यांनाच 'चकोल्या' असेही नाव आहे. कणकेची पोळी लाटून त्याचे शंकरपाळया सारखे तुकडे करायचे आणि चिंच गुळाची काळामसाला घालून खमंग आमटी करून त्यात हे तुकडे सोडायचे आणि शिजवायचे.आमटी पातळसर करायची कारण नंतर खूप आळते.याच्या बरोबर लसणाची चटणी पण झकास लागते.
घाटले- घावन घाटले ही जोडी गौरींच्या प्रसादाला कोकणस्थांत करतात.
तांदळाची कुरकुरीत घावने आणि नारळाच्या दुधात थोडी कणिक/ तांदळाची पिठी थोडी भाजून घेऊन नारळाच्या दुधाला लावतात त्यात गूळ,वेलची घालून शिजवतात,घट्ट होते,मग थोडे दूध मिसळतात.
साधारण खिरीसारखे होते.
शशांक,
तोंडाला पाणी सुटले हो... वरच्या बऱ्याच जोड्यांशी सहमत..
पण काही गोष्टी इथे नाही ना शक्य..उदा.मा.मि.आणि नंतर ताक,
उकडीचे मोदक आणि साजूक तूप विसरलेले दिसते आहे.