साबुदाणा केरळ मध्ये सुद्धा होतो! साबुदाणा परदेशी कसा काय? तसेच मिरची सुद्धा जगभर सर्वत्र मिळुन ८००० हुन जास्त जाती आणि प्रजाती आहेत.
अहो केरळमध्ये होऊ दे नाहीतर काश्मिरमध्ये. जेव्हा युरोपाशी व्यापार सुरु झाला तेव्हा हे सर्व पदार्थ (मिरचीसकट) गेल्या ५०० एक वर्षांत भारतात आले आणि फार नंतर जेवणात सामिल झाले बहुधा गेल्या २०० वर्षांत. कोणी मिरचीपावडर नाहीतर मिरच्या खरेदी करायला भारतात येत नव्हते, मसाल्याचे पदार्थ - दालचिनी, मिरी, लवंगा हे खरेदी करण्यास येत होते, त्याबदल्यात हे पदार्थ भारतात आले. कृपया, आपली माहिती तपासून पाहा. या विषयावर मनोगतावरच विस्तृत चर्चा मिळेल. (ती अर्काइव्जमध्ये गेली असल्याचे दिसते कारण शोधून मिळाली नाही.)
साबुदाणा पचायला हलका का नाही याचा प्रतिसाद वर दिलाच आहे. ज्यांना पटतो त्यांनी घ्यावा.