शुभानन गांगल म्हणतात -
मी देत असलेले मराठी फॉण्ट म्हणजे मराठी ९४ चाव्यात 'Arial' या फॉण्टसारखे कसे बनविता येऊ शकतात की ज्यामुळे ते Windows मधल्या सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे चालतील याची चुणूक आहे. इतरांनीही या पद्धतीचा वापर करून 'Moods of Fonts' बनवावेत व प्रचारात आणावेत असे मी माझ्या मित्रांना सांगू इच्छीतो. या कारणासाठीच आम्ही, मी आणि माझी पत्नी, SGangal, DeGangal हे मराठी आणि HiGangal हा हिंदी फॉण्ट सर्वांसाठी मोफत उपलब्ध केला आहे. इतर संशोधनातून वेळ मिळेल तसा 'Moods of Fonts' आणायचा मी प्रयत्न करीन.
पुढील विषयांवर माझे काम चालू आहे. १) Standardization of Marathi typing for Windows and for Unicode. ज्या संस्था / व्यक्ती याविषयावर काम करून असे फॉण्ट मराठीसाठी मोफत उपलब्ध करून द्यायला तयार असतील त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. २) मराठीच्या लेखनासाठी देवनागरीबरोबर समांतरपणे रोमन लिपीचा वापर करता येईल. कित्येक शतके कोकणी-भाषेने या प्रयत्नातून गोव्यातील मराठी भाषा टिकवून ठेवली होती, हे इतिहास सांगतो. मराठीसाठीचा रोमन-फॉण्ट बनवून तयार आहे. या फॉण्टचा वापर / उपयोग जगातील सर्व भाषांमधील लिप्यंतरणाचा 'भोज्जा' यासाठी कसा करून घेता येईल यावर काम चालू आहे. ३) Unicode च्या 'चित्र-चिन्हांची' सांगड ध्वनी-लिपीशी जोडण्याचा वेगळा संकल्प सुरू आहे.
अशा संशोधनात भाग घेणार्‍या मंडळींच्या मी शोधात आहे. आपण मला मदत करू शकाल कां? माझे हे विचार आपण आपल्या मित्रांपर्यंत पोचवून 'मराठीसाठीचे मराठमोळे संघटन' आपण निर्माण करावे आणि मला त्यात सभासद करून घ्यावे, ही विनंती.
स्नेह. लोभ वाढावा ही इच्छा.
आपला,
शुभानन गांगल