शशांकराव,
मस्त विषय आहे. यावर किती लिहीले तरी थोडेच आहे हे पटले. वर माझ्या आवडीच्या खूप जोड्या आल्या आहेत. ज्या दिसल्या नाहीत त्या अशा (यात काही अखाद्य गोष्टीही जोडल्या आहेत)

दुधावरची साय घातलेल दूध भात आणि कैरीचे लोणचे
बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत, चटणी, कांदा
झुणका भाकर, वाडग्यातले दही, पाउस आणि सिंहगड माथा
कांद्याची भजी, चहा, पाऊस आणि जोडीला आवडीचे संगीत (किंवा क्रिकेट मॆच आणि सचिन मनसोक्त धुलाई करतो आहे)

पुणे विद्यापीठातील क्यांटीनमधला ब्रेडपकोडा आणि चहा

काही परदेशी जोड्या
पिझ्झा आणि बिअर
टोमॅटो सॉस आणि मोझ्झारेल्ला चीज घातलेला पास्ता, बरोबर रेड वाइन आणि ब्रेडचे तुकडे
कच्च्या भाज्यांचे सॆलड, त्यावर थोडेसे ऒलिव्हचे तेल, किंचीत व्हिनेगर आणि चवीपुरते मीठ

हॅम्लेट