परदेशी पदार्थांच्या यादीत डालडा आणि खजूर विसरेले दिसताहेत.  गंमत अशी की गोडे तेल चालत नाही पण त्याच तेलापासून केलेले वनस्पती तूप चालते. मिरची आपल्याकडे चिलीतून आली. म्हणूनच तिला इंग्रजीत चिली म्हणतात. बटाटा डुप्लेने भारतात आणला असे मी ऐकले होते. शेंगादाणे परदेशी .  २०० वर्षांपूर्वी ते भारतात आले. भारतीय पदार्थांपैकी वरी, रताळे, काकडी आणि लाल भोपळा उपासाला चालतात. हळद, हिंग, मोहरी, मेथ्या चालत नाही पण जिरे चालतात.  चहा चालतो, कॉफी नाही. रताळे आणि भोपळा पचायला कितपत हलके आहेत याची शंका वाटते.