आता प्राणीजन्य तुप - जे दुध देतात ते प्राणी शाकाहारीच असतात ना? मग त्या दुधा पासुन केलेले तुप आणि वनस्पती तुप यात फरक तो काय?

हे म्हणजे थोडेसे "गाय शाकाहारी असते, मी स्टेक आणि बर्गर (पर्यायाने गोमांस) खातो, तेव्हा मीही शाकाहारीच आहे" असे म्हणण्यासारखे झाले.  ट्रॅंझिटिव्हिटी [मराठी?] येथे चालत नाही!

साहेब, तुप व दुध आणि स्टेक आणि बर्गर (पर्यायाने गोमांस) यात काही फरक नसेल तर मी माझे म्हणणे मागे घेतो! शक्यतो एखाद्या प्राण्याचा प्राण घेवुन त्याच्या शरिराच्या कुठल्याही भागाचे सेवन वा भक्षण करणे याला आम्ही मांसाहार म्हणतो. दुध काढणे व त्याचे तुप बनवणे यात प्राण घेणे संभवत नाही, पर्यायाने ते मांसाहार या सदरात येत नाही. त्यामुळे माझ्या लेखी दुध-तुप आणि गोमांस याची तुलना होउ शकत नाही. मेहेरबानी करुन यावर जरूर विचार करावा.