वेळूच्या हार्यात अंबाडीची भाजी
लगीन लावलंय गंगीशी आता झाली माजी
सहस्त्रदली कमळात लक्ष्मीचा वास
सुभानरावांना भरवते करंजीचा घास
चांदीच्या ताटात पोह्याचा चिवडा
सुभान्या शोधतोय काजू , मेला पक्का बेवडा
नाशिकचे पेरू, नागपूरची संत्री
गंगी आज पासून आमची गृहमंत्री
आमटीच्या वाटीत चुकून पडली खीर
भेटायला चालले होते सुभान्याला पण आडवा आला दीर