उपपंतप्रधान नव्हे, मुंबई (द्वैभाषिक?) प्रांताचे (राज्याचे?) मुख्यमंत्री. (आठवा: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, फ्लोरा फाउंटन, हुतात्मे वगैरे...)

मोरारजी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते हे माहित आहेच पण वरील उखाण्यात पंतप्रधान असा शब्द आल्याने अत्र्यांच्या हयातीत ते उपपंतप्रधान होते त्याच्याशी संबंधीत असावे का असे वाटून गेले.

लाल बहादुर शास्त्रींनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा अनेकांना ते पद "गुंगी गुडिया"ला न जाता आपल्यासाठी असायला हवे होते असे वाटायचे त्यात मोरारजी एक महत्त्वाचे नेते होते. त्यांना शेवटी उपपंतप्रधानपदावर समाधान मानावे लागले. परंतु एकंदरीत आपापसात न पटल्याने त्याचे पर्यवसान वेगळी चूल मांडण्यात झाले.

संदर्भ तपासलेले नाहीत तरी बरोबर असावेत.

संदर्भ: इंदिरा नेहरू गांधी - कॅथरीन फ्रँक.