माझी आई श्रावणी शुक्रवारी हि पुजा करते. ही पूजा सवाष्णी आपल्या मुलांच्या दिर्घायुष्यासाठी आणि मुलाच्या सुखासाठी करते.यासाठी जिवतीची छापिल प्रतीमा (फोटो) बाजारात मिळते. त्यात मध्यभागी देवी जिवती मुलांचा सांभाळ करतानाचं चित्र असतं वर नाग आणि नृसिंह आणि खाली बुध आणि बृहस्पतीची प्रतिमा असते. यातल्या नागाची नागपंचमीला पुजा होते. तर जिवतीची दर शुक्रवारी पुजा होते. पहिल्या शुक्रवारी जिवती पुढे नारळ ठेवतात तो महिना संपेपर्यंत तसाच ठेवायचा असतो. नंतर हळद, कुंकु, हात, गजरा इ. गोष्टिंनी त्या देवीची पुजा होते. देवीला कापसाचे वस्त्र आणि विड्याचे पान ठेवलं जातं. नंतर देवीची पाच पुरणातल्या दिव्यांनी आरती होते. त्याच दिव्यांनी नंतर आई मला आणि माझ्या भावाला ओवाळते. (खरतर नुसतं ओवाळत नाहि तर संपूर्ण औक्षण करते. ). हेच दिवे विझले की त्यातलं पुरण प्रसाद म्हणून सगळे खातात. शिवाय चणे-गुळाचा वेगळा नैवेद्य दाखवते. याशिवाय पुजेचा एक भाग म्हणून एका शुक्रवारी सवाष्ण बाईला जेवू घालतात.
आई सहसा श्रावणतल्या आम्हाला ओरडायची नाहि (अजुनहि ओरडत नाहि) त्यामुळे हा दिवस मलाअ विषेश आवडायचा