सखि स्तब्ध झाला बारक्या आता बिल देशील का ?

किटलीत आहे चाय अन हातात आहे बिलही

ते शेंगदाणे चावताना हे बिल तू देशील का ?

इडली सांबार चटणी घेतलीस तू रेटोसुनी

हा घास अंतीम राहिला त्या "अर्थ" तू देशील का ?

जे जे हवेसे  जेवूनी ते सर्व आहे चापले

तरीही ऊरले काही चणे ते तु फ़स्त करशील का ?

बोलावल्या वाचूनही शेठ जरी आला इथे

थांबेल तोही पळभरी , पण बिल तू भरशील का ?