दिल्लीचा पेठा, गोव्याचे काजु,
'क्ष' रावांना थोबडवायला मी का लाजु.
घरापुढे अंगण, अंगणापुढे ओसरी.
ओसरीपुढे माजघर, माजघरात फडताळ.
फडताळयात भुगला, त्यात ठेवला खवा.
'क्ष'राव आले घरला ... आता तुम्ही जावा.
संसारचा गाडा चालु आहे सुकर,
भाजी चिरते मी, 'क्ष' राव लावतात कुकर.
'क्ष' रावांच्या आठवणी कशा कशा साठवु?
दोन पेग रिचवले आता काय कप्पाळ नाव आठवु?