महेशजी व अन्य तज्ज्ञ,
मी माझ्या कार्यालयातील विपत्रव्यवस्थेबद्दल लिहिले होते. (कार्यालयीन अग्निभिंतीमुळे बाह्य व्यवस्था सहजासहजी वापरता येत नाहीत)
आमच्या कार्यालयात विपत्रहाताळणीसाठी एक मुक्तस्रोतप्रणाली (नाव माहीत नाही) वापरतात. साधारणपणे २ दशलक्ष बाइट्स पर्यंतचे टपाल येण्याजाण्यामध्ये अडचण येत नाही (जोडलेल्या संचिका वगैरे धरून). पण हे झाले इंग्रजी भाषेतल्या पत्रांविषयी.
युनिकोडित मराठी पाठवायचा अवकाश की अशी कटाई बहुधा होतेच.
हे का होत असावे? तांत्रिक कारण नक्की काय असावे? कार्यालयीन विपत्रसेवकाचे सेटिंग बदलून उपाय निघू शकेल का?
सल्ल्याची वाट पाहतो आहे.
- दिगम्भा