वेदश्री,

आईला दिलेले सरप्राईझ फार आवडले. सरप्राईझ देण्यातून अशी हृद्यता साध्ता आली की सरप्राईझ देण्याऱ्याचा आणि घेणाऱ्याचाही आनंद शतगुणित होतो यात शंकाच नाही.  यातली मौज महत्त्वाची. त्यातून दु:ख निर्माण होऊ नये एवढी काळजी घेतली पाहिजे.

माझ्या एका लहान पुतण्याने मला एकदा वाढदिवसाला सुबक वेष्टण घातलेल्या काड्यापेटीतून एक भले मोठे झुरळ घालून देण्याचा वात्रटापणा केला होता. त्यावेळी माझी उडालेली घाबरगुंडी मला आठवली की अजूनही अंग़ावर शहारा येतो.