शशांकराव,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रतिभेचे घोडं उधळलच आहे तर दोन-चार रपेटी माराव्यात म्हणतो

जोश्यांचा वडापाव, बरोबर झणझणीत मिरची
सुभान्या बसला अन मोडली की हो खुर्ची

वरण-भात-बटाट्याची भाजी, दरवळतोय सुवास
सुभान्या आला की होतो अस्वलाचा भास

उकडलेल्या शेंगा सोलल्या, त्याच्या ढिगभर साली
सुभान्यानं मांड टाकली अन घोडं बसल की हो खाली

हॅम्लेट