एक अनोखा प्रयत्न, सुंदर व प्रवाही शैली आणि अभिप्रेत असलेली संदिग्धता ह्याबद्दल चौकस ह्यांचे कौतूक करायला हवे.
पण 'लाल रंगाकडे त्याचा कुंचला वळताच रक्ताचे पाट....' वगैरे आठवले, तसेच तिथेच, मला वाटते, '....शंभर वर्षांच्या जुन्या पोथीतून लावलेला आजच्या जगाचा अर्थ, त्यासाठी मारलेल्या अतर्क्य कोलांट्याउड्या, सर्वत्र 'आपले' राज्य येईल या आशेवर जगलेले आणि मेलेले असंख्य कार्यकर्ते आक्रोशत पुढे झाले'. कार्ल मार्क्सच्या कालबाह्य पोथीचा आमच्या 'डाव्यां'ना अजूनही विसर पडलेला नाही, जरी त्यांच्या 'बापां'नी त्या पोथीला केव्हाच झुगारलेले आहे, तरीही.
पण काय आहे, ह्या पिवळ्या चड्डीवाल्यांनी जगाला एक करमणूकीचे साधन फुकटात दिले आहे. ज्या समाजाचा ते उद्धार करू इच्छितात, तो निद्रिस्त आहे, त्याला काहीही सोयरसुतक नाही. ह्या व अशा कारणांनी त्यांच्या धडपडीला यश तर राहूदेच, थोडीफार विश्वासाहर्ता येण्याचीही पण सुतराम संभावना निदान नजिकच्या काळात तरी दिसत नाही. पण ह्या अशा बावळट वाटणाऱ्या त्यांच्या चळवळीमुळे बऱ्याच लोकांना खाद्य मिळते. मग मनोगतावरचे साम्यवादी विचारांकडे झुकणारे लेखक असूद्यात, की गोऱ्या जगाला 'मागणी तसा पुरवठा' करणारे अलिकडे बोकाळलेले इंग्लिशमधून लिहीणारे भारतीय (किरण देसाईचा सन्माननीय अपवाद वगळता) लेखकू असूद्यात, ह्या चड्डीवाल्यांना झोडपण्यात आनंद मानतात. ते तसे एकदम सेफही आहेच!
आता इथेच बघा ना, लाल रंगात रक्ताचे पाट उमटले, हिरव्या रंगात बाकी काहीही ना आठवता एकदम अर्धशिक्षीत आदिवासींचे पाडे कसे बळकावले जातात, त्याची आठवण झाली. आणि मधूनच कोलांट्याउड्या मारत पिवळ्या 'रंगा'ला आणावेसे वाटले!
आता मी ओळींमधल्या 'व्हाईटस्पेसेस'ही बारकाईने वाचत फिरतो!