गाणार्या कडुनिंबास स.न.वि.वि.
दिधले, तव, तुज अशक्यच असेल तोपर्यंत टाळावेत का?
शक्यतो टाळावे.पण कधी छंदाच्या मर्यादेमुळे वापरावे लागतात तर कधी मोह अनावर होतो.त्यांना टाळून,छंद सांभाळून जे सांगायचे ते योग्य रीतीने मांडणे दरवेळी नाही जमत.
रूपगर्विता, अप्सरा, प्रेमभारे, देवे यासारखे शब्द खटकतात का? भाषा २००५ ची वाटायला हवी का?
आपल्या भाषेचा पोत बहुश: संस्कारक्षम वयात जे ऐकले-वाचले त्याने ठरून जातों.नंतर फक्त 'पॉलिश' करणे होते.आणि भाषा दर वर्षी उपडेट करण्याइतका उत्साह नाही उरला.
प्रणाम ऐवजी सलाम झाले चालले असते का.
'सलाम' हाच शब्द आधी सुचला होता, वापरणारही होतो. पण वाक्य जरा यवनी वाटू लागलं.
एका गोष्टीची खंत वाटली. ह्या गझलेचा मला जो दुसरा अर्थ जो अभिप्रेत होता तो कोणापर्यंत पोहोचलाच नाही.'ती' च्या जागी विठुमाऊलीला कल्पून ह्या रचनेचा आस्वाद घेतला जावा अशी इच्छा होती. शीर्षकावरून व 'पाहून संत-साधू...' ह्या ओळीवरून ते मला सुचवायचे होते पण मी अयशस्वी ठरलो.
मिलिंद