सर्वश्री भास्करराव, भोमे काका, कडु, विनायक, सुमंत, सुभाषराव, आशुतोष आणि सर्व लोकहो,
तुमच्या सर्वांची मते योग्य आहेत यात संशय नसावा. मलाही यात असलेल्या अनंत अडचणीची कल्पना आहे. कदाचित बससेवेसारख्या सामान्य गोष्टीला किती अडचणी आल्या, त्यातील वेगवेगळे वाद- प्रवाद, परत अतिरेकी शांतही बसणार नाही हे सर्व मुद्दे मला मान्य आहेत.
आमच्या मनात एक प्रकारचा स्वप्नाळु स्वभाव असला तरी अकारण भाबडेपणा मला मान्य नाही. आदर्शवाद बरा वाटला तरी अकारण असलेला अव्यवहारी भाव आपल्याला कोठेतरी भरफटत घेवुन जाईल हेही मला मान्य आहे.
माझ्या मनात सध्या खालील विचारतंरग येतात.
१. या सर्व प्रयासाची फलश्रुती काय असेल? एक चांगले शेजारी की परत एकत्रीकरण, की केवळ वेळेचा दुरुपयोग?
२. यातुन व्यापार, आदान-प्रदान, नागरीकांचा एकमेकांच्या देशातील प्रवास वाढू शकला तरच हे प्रयत्न पुढे जातील, अन्यथा एखादा बॉम्बस्फोट या प्रक्रियेला खिळ घालु शकेल.
३.आपण या सर्व प्रयत्नाकडे एक हिंदुपेक्षा एक भारतीय म्हणु पाहु शकतो काय? आपल्या देशामध्ये अनेक भाषा, अनेक जातींना आपण सामावुन घेतले आहे, तेंव्हा त्याच मोजमापाने आपण गरीब पाकिस्तान्यांना सामावुन घेवु शकतो काय? आणि पाकिस्तान आपल्याला सामावुन घेवु शकतो काय?
४. भारत - पाकिस्तानांची एकच संस्कृती आहे हे आपल्याला मान्य आहे काय? नेपाळपेक्षा आपल्या मनात पाकिस्तानबद्दल जास्त प्रेम अथवा द्वेष वाटत असतो. त्यामुळे आपल्याला हिंदु नेपाळ भावनिकदृष्ट्या दुर आहे हे मान्य आहे काय?
असो. भविष्यकाळ याबाबत जास्त उत्तरे देईल यात शंका नाही.
द्वारकानाथ.
( भारतीय पंजाब शासन पाकिस्तानमधील साहित्याचे पंजाबी शालैय अभ्यासक्रमात समावेश करत आहे, शिखलोकांनी मुज़फराबादच्या गुरुद्वारा जाण्यासाठी बसची मागणी केली आहे, पंजाबमध्ये नागरीक पाकिस्तानबरोबर प्रवासाच्या सुविधांची मागणी करत आहे असे वर्तमान ऐकत आहे. आमच्या नागपूरच्या भाषेत 'माहौल' जमत आहे. दोन्ही देशाच्या नागरीकांनी आपले म्हणने घडवुन आणले तर अनेक प्रश्न सुटले जातील यात शंका नाही. इन्शाला नव्हे तर परमेश्वर दोन्ही बाजुला किमान शहाणपण देवो. )