कुसुम/कुसुंब:  विदर्भ(मेळघाट) व कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्या वृक्षांना एप्रिल महिन्यात गुलाबी रंगाची पालवी फुटते. जुलै/ऑगस्ट महिन्यात द्राक्षाच्या घोसासारखी फळं येतात. पक्ष्यांना ही फळे अतिशय आवडतात म्हणून पिकायच्या आधीच ते खाऊन टाकतात. ह्या झाडातुन हलकेसे तुषार उडत असतात त्यामुळे वाघ ह्या झाडाखाली विश्रांती घेत असतो. ह्या झाडाच्या फुलांपासून रंग तयार करतात. एक झाड एका डेझर्ट कुलरच काम करतो.

जुन्या जाणकार लोकांना जंगलातील कोणती लाकडे गोळा करायची हे माहित असते. ते ही वानरांची लाकडं गोळा करत नाही. ' वानराची लाकडं चुलीला साकडं' अशी म्हण आहे.

११ वानरे गळ्यात गळे घालून बसली होती आणि सगळ्यांनी एकदम माना टाकल्या. काकांना वाटल ह्या वानरांचा काही खेळ सुरु आहे. त्यांनी काडीने ढोसून पाहिले तो काय सगळी वानरे गतप्राण झालेली!  वानरे जंगलात फिरून फळ व मध आपल्या पोटात साठवतात व ढोलीत ओकतात/बाहेर काढतात, त्याचे लाडू करून ठेवतात. ज्यांना योगाचं ज्ञान आहे ते ही क्रिया समजू शकतात.

राजहंस पक्षी कमळाचे देठ चिरून त्यतलं क्षीर (बिसतंतू)पितो.

'लांडगा'  क्राय ऑफ वुल्फचा जगदीश गोडबोले ह्यांनी केलेला अनुवाद आहे.

काका कोकण किनारपट्टीवर २ वर्ष राहिले. रोज कोळ्यांबरोबर मासेमारी करायला जायचे. जवळपास ४२५ प्रकारचे मासे इथे पहायला मिळतात. मराठीत जी नावे आहेत तीच नावे पोर्तुगीज भाषेत आहेत.

पक्षी व रानकुत्रे अश्या दोन ऑडियो कॅसेटस पुण्याचे विवेक देशपांडे ह्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांचा दूरध्वनी क्र. ९४२२५१३४८८, ०२०-२४४७६६०१.