आशुतोष,
तुम्ही व्यवहार्यतेचा विचार मुळातुनच केलेला आहे. मला असे सांगायचे होते की डाँक्टर्सनी इंग्रजी औषधे मराठीतुन लिहुन द्यायला हवी किंवा आपण तशी मागणी करायला पाहिजे. उदा. कफ सायरप दिवसातुन तीन वेळेस घेणे, शुगर तपासुन घेणे, अमुक आमुक गोळ्या इ.इ. असे मराठीत लिहले गेले पाहिजे. माझ्या माहितीत काही डॉक्टर्स असे लिहुन देतात.
कोणताही लढा, लढाई फार खटाटोप न करता सोप्या, सहज आणि सर्वसाधारण लोकांना जमेल अशीच लढली पाहिजे. मराठी भाषेसाठी हाच नियम असावा.
द्वारकानाथ.