लेखन स्वीकारण्याची तारीख उलटून गेली असल्याने आता लेखन-निवडीचे काम सुरू झाले आहे असे मला वाटते. आलेले सर्व लेखन स्वीकारणार वा काही निकषांवर न उतरल्याने वा मासिकामध्ये जागा न राहिल्याने साभार परत पाठवणार? आलेले सर्वच लेखन स्वीकारले जाणार नसल्यास किमान ज्यांचे लेखन स्वीकारले गेले नाही अशांना तसे लवकरात लवकर कळवावे, म्हणजे त्यांचे लेखन त्यांना इतरत्र प्रकाशित करता येईल.
मासिकामध्ये स्वीकारलेले लेखन मासिकाच्या प्रकाशनानंतर इतरत्र (पक्षी: मनोगत, उपक्रम वा वैयक्तिक अनुदिन्यांवर) प्रकाशित करण्याची मुभा लेखकांस आहे का? त्यासाठी संपादक मंडळाची परवानगी आवश्यक आहे का?