"त्या संमेलनाचे प्रयोजन काय आहे? त्याचे काय परिणाम होतील?" अशासारखे प्रश्न उपस्थित करू नयेत असे मला वाटते. आज कोणालाही संमेलन भरवण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. संयोजकांनी अशा प्रश्नांचा विचार केला असणारच.
असे मी लिहिले होते तरीही याच विषयावर सारी चर्चा झाली.
'चित्पावन' या संज्ञेची व्याप्ती 'अमुक अमुक वैशिष्ट्ये सांभाळणारे' अशी संकुचित ठेवावी की हवी तेवढी विस्तृत करावी यावर मत मांडले गेले तर त्यातून विचारांना चालना मिळेल असे मला वाटते.
या मुद्द्यावर लिहावेसे फारसे कोणाला वाटले नाही. फक्त अज्जुका यांनी त्यावर भाष्य करून मला कुत्सित ठरवण्याचे काम केले.
एकंदरीत पाहता चर्चेचा उद्देश साध्य झाला नाही.