स्वयंसुधारणा आणि शुद्धचिकित्सक या सुविधा फारच छान आहेत. पण हे झाले "मनोगत" वर बाकीच्या ठिकाणी या सुविधा वापरता येत नाही त्याचं काय ? खरं तर या सुविधा सर्वाना सर्व ठिकाणी वापरता येतील असे झाले तर उत्तम होईल,त्या करिता मनोगत च्या प्रवर्तकांनी काही "शुल्क" आकारले तरी चालेल,  ही सुविधा सर्व ठिकाणी सर्वांना दिल्याने प्रवर्तकांचा "डेटा" लवकरच समृद्ध होईल.  नाहीतर या महत्त्वाच्या सुविधा पासून बाकी सर्व वंचीतच रहातील.

ही सुविधा विना शुल्क देण्याच्या दृस्टीने ही विचार व्हावा, पण हे सांगणे सोपं असले तरी प्रवर्ताकांनी या संशोधणा करीता खर्च केलेले परिश्रम आणि वेळ  लक्षात घेता हे शक्य नाही.