वरदा,
नेहमी प्रमाणेच दोन्ही लेख उत्कृष्ट आणि रंजक माहितीने परिपूर्ण आहेत. पृथ्वीच्या कलत्या अक्षाचा आणि पृथ्वीवरील ऋतुमानाचा संबंध हा या आधीचा लेख मला दोन वेळा वाचल्यावर लक्षात आला. (मठ्ठ बुद्धी, दुसरे काय!) चंद्राकर्षण, लाटा, हिमनग आणि तापमान यांचे परस्पर संबंध वाचून आश्चर्यच वाटले. निसर्गाच्या परस्परसंबंधी क्लिष्ट आणि भव्य घटनाक्रमाने आपण मानव किती क:पदार्थ आहोत हे जाणवते. अर्थात, 'असे का?' हे शोधण्याची मानवाची उर्मी आणि ताकद निसर्गाशी सकारात्मक स्पर्धाच करत आहे.
धन्यवाद.