हमदम - बऱ्याच जणान्नी हमदम चे भाषांन्नतर जमले नाही असे कळवले आहे. मला मान्य आहे. मी हमदम चा अर्थ जिवाला जीव देणारा/देणारी असा घेऊन भाषांंत्तर केलेले आहे.
कारवा - ह्यालाही मराठीत शद्ब मिळाला नाही. यात्रा दिंडी वरात जथा असे शब्द आव्डले नाहीत म्हणून कारवा न घेता दोघे उरांनाघेऊन चाललो असा अर्थ घेऊन पुढे गेलो.
स्पंदत्या उरांची घेउन - पालखी
जाणार दोघे कोठे कळेना
अशी ओळ वापरता आली असती , पण ते नंतर सुचले तेव्हा उत्तरे आल्याने बदल करता आला नाही.
यमके - मूळ गाण्यात यमकावर फार भर दिसला नाही. गाताना अडखळो नये अशी फक्त यमके दिसली, म्हणून मीही यमकेनवापरण्याचा चान्स घेतला.
सर्वांनी आपुलकीने मार्गदर्शन केल्याबद्दल आभार.