वरिल पैकी दासबोधामध्ये अनेक विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन असून मनाचे श्लोकांमध्ये,एकेका वाक्यात अतिशय महत्त्वाचे असे सांगितले गेले आहे.हे सर्व ज्याचे त्यानेच वाचणे आवश्यक आहे.त्यांचे अभ्यासाने जीवन कर्तत्वपूर्ण होऊ शकेल.पण समर्थ रामदास हे संत परंपरेत समाविष्ट केल्याने त्यांचे वाचन फ़क्त हिंदू धर्मीय माणसे उतार वयाकडे झुकल्यावर करतात. अन्य धर्मीय ते  वाचतच नाहीत.खरे तर त्यां चा अभ्यास जगातील प्रत्येकाने,किशोर अवस्था ते युवा अवस्था,  केला पाहिजे्.हिंदू धार्मिकता लक्षात न घेता त्यातील आचरण विषयक सुचनांचे पालन केले तर जीवन कृतार्थ झाल्याशिवाय रहाणार नाही.इतके महत्त्वाचे मनाचे श्लोक व दासबोध आहेत.