एकदा बायकोच्या वाढदिवसाला पोचेल अशा बेताने इंटरनेटबरून चॉकलेटचा पुडा मागवला... आणि फेडेक्सने तो वेळेवर पोचवलाही... संध्याकाळी घरी आलो तेव्हा वाटलं की बायको आता त्या सरप्राईजबद्दल माझं कौतूक करेल... मी काहीच बोललो नाही... जेवणं झाली झोपायची वेळ झाली तरी चॉकलेटचा विषय निघेना. शेवटी न राहवून मीच विचारलं "काय कशी वाटली चॉकलेट? आवडली का?" तर बायको म्हणते "कसली चॉकलेट?".
"म्हणजे मी इंटरनेटवर मागवलेली चॉकलेट नाही मिळाली?" -मी.
"छे, आज कुठलंच पॅकेज आलं नाही." - बायको.
"ऑ... मग फेडेक्स नि कुठे पाठवला तो पुडा?" - मी मनातल्या मनात.

दुसऱ्या दिवशी उलगडा झाला की फेडेक्सनी आपलं काम चोख केलं होतं, पण दाराबाहेर सुंदर वेष्टणात बांधून ठेवलेला तो पुडा कोणी खोडकर पोरांनी लांबवला होता...