अहो जातीजातीत अगदी दुसऱ्या जातीची टवाळी केली नाही तरी थोडेफार आपल्या माणसांत 'नाही बुवा , त्यांच्यापेक्षा आपल्यातल्या पद्धती जास्त चांगल्या आहेत' यावर काथ्याकूट होतोच. जाती पोतजाती सोडाच,शेजाऱ्यांत, दोन विवाहीत बहीणींत 'आमच्यातल्या आणि ताईच्यातल्या रितीभाती' यातली तुलना असतेच.
कुणास ठाऊक, एखादी कॅथॉलिक मेरी तिच्या प्रोटेस्टंटाशी लग्न जुळवणाऱ्या मुलीला 'बघ हां, विचार कर. आपल्यातल्यासारखं त्यांच्यात नसतं. बोलून चालून प्रोटेस्टंटाची जात!' वगैरे काहीतरी वाक्य आंग्लभाषेत बोलत असावी.
(डिसक्लेमर: मी चित्पावन नाही.)