टवाळ,
हमदम = जिवाला जीव देणारा असे असेल तर = जिवलग म्हणता येईल
कारवा = तांडा . शब्द जरा खडबडीत वाटतो . त्याचा वापर समर्थपणे केला तर छान जमेल.
मला नक्की आठवत नाही पण एका प्रथितयश कवीच्या कवितेत वाचलेली
' चालला, चालला लमाणांचा तांडा' अशी एक ओळ आठवते.
आणि
कवितेच्या पहिल्या दोन ओळीत तुम्ही केलेला बदल अधिकच छान आहे.