नमस्कार,

'साधं... सोपं...'  (www.sadha-sopa.com) या संकेतस्थळावर माझ्या गझला, कविता व अन्य लेखनाचं मी आज प्रकाशन करत आहे.  'साधं... सोपं...'  द्वारे  माझे तीन गझल संग्रह , एक कविता संग्रह , एक  हास्यकविता संग्रह आणि एक विडंबन संग्रह प्रकाशित करत आहे. हे सर्व संग्रह आपल्याला (www.sadha-sopa.com/book) येथे पहायला मिळू शकतील. याशिवाय, आपल्या सवडी व आवडी प्रमाणे साहित्यप्रकार, भावार्थ किंवा आशयानुसार लिखाण शोधणं आणि वाचणं शक्य होईल अशी व्यवस्था संकेतस्थळावर केली आहे.

आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया यांचं मनापासून स्वागत आहे! आपले अभिप्राय आपल्याला मराठीमधे देता येतील अशी सोय ही केलेली आहे! या शिवाय आपल्याला येथील साहित्याचं गुणांकनही (Star Rating) करता येऊ शकेल.

गेल्या पाच - सहा वर्षांत मायबोली व मनोगत या दोन संकेतस्थळांवर मी जे काही लिहिलं त्यातील बहुतांशी साहित्य या संकेतस्थळावर प्रकाशित केलं आहे.  आणि यापुढील लिखाणही नियमित पणे तेथे प्रकाशित / संकलित करत रहावे असा विचार आहे.

आपण या ऑनलाईन मैफलीला भेट द्यावी ही आग्रहाची विनंती... आणि आपल्याला हे संकेतस्थळ व येथील साहित्य आवडलं तर याचा पत्ता इतरांनाही कळवावा ही विनंती!

प्रसाद शिरगांवकर
www.sadha-sopa.com