मराठीत नवीन संकेतस्थळसर्व मनोगतींसाठी नवी माहिती. मराठीत सध्या दैनिकांची वगळता रोजच्या रोज अद्ययावत होणारी व वैविध्यपूर्ण माहिती देणारी संकेतस्थळे फार कमी आहेत. मात्र आता http://marathi.webdunia.com/ हे एक नवे संकेतस्थळ नुकतेच मराठी विश्वात दाखल झाले आहे. व्यावसायिक विचार त्यात जास्त केलेला दिसतो. त्यामुळे संकेतस्थळावर आलेला वाचक सुटू नये यासाठी अनेक बाबींची योजना केलेली दिसते. अगदी बातम्यांपासून ते आरोग्य, सौंदर्य, साहित्य या विषयांबरोबरच ज्योतिष, फेंगशुई आणि बॉलीवूड हे विषयही त्यात दिसताहेत. मराठी चित्रपटांचाही त्यात एक भाग आहे.