हेनमस्कार,

ह्या लेखामध्ये थोडी सुधारणा व नविन माहीती..... नव-उत्सुक पर्यटकांसाठी.

चांगी हे जगामधले 'वन ऑफ़ द' उत्क्रुष्ट अशा एअरपोर्ट पैकी एक आहे. मागील ३-४ वर्षांपासुन नंबर १ चा मान मिळत आलेला आहे. डिजाईन आणि कन्स्ट्रक्शन च्या तुलनेने इतर तिन्ही टर्मिनल खरोखर उजवे आहेत. अ-३८० मिळाल्यापासुन अजुन बऱ्याच सुधारणा चालु आहेत.

एअरपोर्ट मध्ये असणाऱ्या ट्रांसिट दरम्यान ७-८ तास घालविण्यासाठी ट्रव्हलर्स करता फ़्री सिंगापुर राईड ची योजना आहे. फ़क्त तुमचा बोर्डिंग पास दाखविल्यावर १ तासाच्या अंतराने फ़्री बस घेता येते.

दंडाची भीती म्हणा पण त्याच्यामुळेच शिस्त आहे. भारतात परत गेल्यावर शिखात चॉकलेट चे कव्हर ठेवणारे सिंगापोरीअन-मराठी लहान मुले बघितलेली आहे. त्यामुळे मोठ्यांना पण तशीच सवय लागते. च्युईंगम ला सुद्धा इथे बंदी आहे ते एका छोट्या कारणामुळे. ट्रेन चे ऑटोमटीक दरवाजे बंद झाल्याशिवाय ट्रेन पुढे चालत नाही. आणि मागे काही उपद्रवींमुळे बऱ्याच ट्रेन ला बिलंब झाला. ह्या एका वेळ वाचविण्याच्या कारणामुळे तुम्ही इथे च्युईंगम आणु शकत नाही.

नियम हे जसे सामान्य जनतेसाठी आहेत तसेच, ते सरकार सुद्धा पाळते. ५-६ वर्षांपुर्वी, फ़क्त १ तास सगळ्या सिंगापुर मध्ये पॉवर ट्रिप झाला होत. त्या एका तासाच्या भरपायी साठी त्या खात्याच्या मिनिस्टर ने दुसऱ्या दिवशी जनतेची संसदेत माफ़ी मागीतली व इलेक्ट्रीसिटी बोर्डाला १ मिलीयन चा दंड केला.

सगळ्या सिंगापुर मध्ये स्वच्छता मिळेल पण सरंगुण रोड वर(जिथे मुस्तफ़ा सेंटर आहे) गेल्यावर पुर्ण पणे भारतात वावरतोय याची जाणीव होते. एन.टी.यु. सी फ़ेअर प्राईज व जायंट सारखे मॉल असल्यामुळे भरपुर देसी लोक्स मुस्तफ़ा ला जायचे टाळतात. वीकएंड ला तर पाय ठेवायला जागा नसते. पण एक चांग़ले की, नाशिक ची ताजी मेथी, शेपु, पालक, कोथींबीर, भेंडी, गवार मिळत असल्याने २ वीक मधुन एकदा तरी चक्कर होतेच. एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, मुस्तफ़ा चे २ विभाग आहेत आणि दोन्ही ठीकाणी सारख्याच वस्तु मिळतात. तुलनेने नवीन विभागात गर्दी कमी असल्याने तिथे निवांत शॉपिंग करता येते.

ड्राईव्हींच्या नियमांनुसार तुमच्या गाडीला असलेला हॉर्न ही ऑप्टशन वस्तु आहे. दंडाच्या भीतीने कुणी जास्त ध्वनी पदुषणा च्या फ़ंदात पडत नाहीत. आणि रस्ता क्रॉस करायला झेब्रा क्रॉसिग वर पहीला हक्क पायी चालणाऱ्यांचा असतो. तुम्ही झेब्राक्रॉसिग च्या दिशेने येतांना बघिअतल्यावर कार चालकास थांबणे जरुरीचे आहे. आणि सिग्नल्स तर २४ तास चालु असतात.

टक्सी ड्राईव्हर सुध्धा अतिशय प्रामाणिक आणि वेळ-प्रसंगी मीटर पेक्षा फ़ेअर केमी घेणारे.

ऑर्चर्ड स्ट्रीट वर टाकाशिमाया व तत्सम शॉपिंग मॉल्स  हे ए टू झी शॉपिंग  साठी प्रसिद्ध आहेत.

सेंटोसा मध्ये खरतर एक पुर्ण दिवस लागतो, सगळ्या चांगल्या गोष्टी कव्हर करायला. पण बहुतेक वेळा गाईड अर्धा दिवस देतो. आणि तो अपुर्ण आहे. केबल कार, माउंट फ़ेबर, स्काय टॉवर, ईमेजेस ऑफ़ सिंगापुर,  सिलोसो फ़ोर्ट, बटरफ़्लाय पार्क, ४-डी मेजीक, डॉल्फ़ीन लगुन व अंडरवॉटर वर्ल्ड, मेरीलायन पार्क राईड आणि शेवटी वॉटर-फ़ायर शो करीता एक दिवस पाहीजेच. बहुतेक टुरीस्ट ना जास्त माहीत नसते, ह्याचाच फ़ायदा गाईड घेतात आणि अर्धा दिवस मध्ये सेंटोसा संपते. जर कुणी सेंटोसा ला येत असेल, तर ही लिस्ट जरुर तुमच्या गाईड ला विचारावी.

अंडरवॉटर वर्ल्ड मध्ये प्रथम स्लाइडिंग वे वर एक चक्कर करुन बघावी, जेणे करुण आपणास सगळी माहीती येते. मग नंतर निवांत जो मासा चांगला वाटतो, त्याचे मनसोक्त निरिक्षण करावे. फ़ोटो मग पुढच्या चक्कर मध्ये काढावेत.

डॉल्फ़ीन लगुन शो ला, डॉल्फ़ीन जवळ बोलवितात. अशासाठी पुढे बसणेच योग्य. पण त्याला पाण्यामध्ये भिजायची तयारी ठेवावी.

मेरीलायन हा सिटीहॉल व रेफ़ल्स प्लेस जवळची जागा. फ़ुलरटन हॉटेल बरोबर उंच बिल्डींग ची बेकग्राउंड शोभनीय आहे. हा सगळा ऑफ़िसेस चा परीसर. जवळच 'लाउ पा साट' हे आशियातले सगळ्यात मोठे फ़ुड-कोर्ट आहे. क्रिश मध्ये हृितीक इथुनच पडला होता. ह्याच रस्ता क्रिश च्या वेळेस बंद होता.

सनटेक सिटी इथुन जवळच. डाव्या हाताचे ५ ही बोट आकाशाकडे गोलाकार केल्यास जो आकार येतो, त्या प्रमाणे ह्या ५ इमारतींची रचना आहे. मध्यभागी कृत्रिम वॉटरफ़ॉल असुन, इथले पाणि पवित्र मानले जाते. संध्याकाळी इथला लेजर शो बघण्यासारखा आहे.

अमित